उद्या लग्न आहे
जन्मशताब्दीचाच एक संकल्प म्हणून बाबांची समग्र साहित्यसंपदा ब्लाॅगवर उपलब्ध करायचे ठरविले. काही दिवसांपूर्वीच संकल्पपूर्ती झाली. आता बाबांचे तीन ग्रंथ: 'अमृत कलश' हा भक्तिगीतसंग्रह, 'मज्जीवनमणिमाला' हे आत्मचरित्र व 'अध्यक्ष महाराज' हे शालेय विद्यार्थ्यांना विविध शालेय स्पर्धांत उतरवितांना त्यांच्यासाठी लिहिलेल्या निबंधांचे, भाषणांचे, नाटकांचे संकलन 'सदाशिव साहित्य' म्हणून सर्वांना सहज इंटरनेटवर वाचता येतील.
जन्मशताब्दीचेच निमित्त करून मी माझा तिसरा काव्यसंग्रह 'बालवेद' नुकताच प्रसिद्ध केला.
सर्वच आता एक एक करून ब्लाॅगवर उपलब्ध आहे, म्हणून आज माझी सर्वप्रथम प्रसिद्ध झालेली दीर्घकविता 'उद्या लग्न आहे' सुद्धा इंटरनेटवर उपलब्ध करीत आहे. वाचली नसल्यास वाचावी. अभिप्राय कळवावा. सर्वच प्रतिक्रिया जसजशा येतील तसतशा 'प्रतिसाद' लिंकवर संकलित होतील.
धन्यवाद!
अरुण सदाशिव मोहरीर
२५-११-२०१५
arun.moharir@gmail.com
उद्या लग्न आहे
प्रतिसाद
No comments:
Post a Comment